
नवी दिल्ली: नागरिकत्व विधेयकावरून देशभरात सुरू असलेले आंदोलन दिल्लीत धडकले. आज सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केले. जामियानगर ते ओखलाकडे मोर्चा निघाला. या आंदोलनात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश होता, असे सांगण्यात येत आहे. या मोर्चावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांत राडा झाल्याने हिंसक आंदोलन पेटले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे आंदोलन आणखी चिघळले. आंदोलनकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा तसेच प्लेकार्ड घेऊन नागरिकत्व कायद्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
हिंसक आंदोलनाचा फटका मेट्रो स्टेशनला बसला आहे. दिल्ली मेट्रोने ट्विट केले. दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यानंतर मेट्रोने जामिया मिलिया इस्लामिया, ओखला विहार आणि जसोला विहाल शाहीन बाग मेट्रो स्टेशनवरील प्रवेश व बाहेर जाणारा रस्ता बंद केला आहे.
नागरिकत्व विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर आसाम, पश्चिम बंगाल व दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू आहेत. आसाम व पश्चिम बंगालमधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे आंदोलन आणखी चिघळले. आंदोलनकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली.






