हिवाळी अधिवेशन: सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभनंदनाचा ठराव मंजूर

नागपूर: शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात आज देशाचे नवे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनपर प्रस्तावानं झाली. विधानसभेचं कामकाज सुरू होताच न्यायमूर्ती शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात झाला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. मुख्यमंत्र्यांनी बोबडे यांच्या आजवरच्या कार्याचं कौतुक करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘एक मराठी व्यक्ती सर्वोच्च पदी बसतो आहे, ही बाब अभिमान ऊर भरून येणारी आहे. त्यातही मूळचे नागपूरचे असलेल्या बोबडे यांचा सत्कार नागपूर अधिवेशनात होतो आहे हाही एक दुर्मिळ योगायोग आहे, असं ते म्हणाले.