हिवाळी अधिवेशनाची सांगता, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शेतकरी कर्जमाफी सहित अनेक घोषणा

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत हे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच सिंचन प्रकल्पाची कामे जी कामे राहिली आहेत, ती आधी पूर्ण केली जातील. तसेच राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारण्यात येईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गासाठी आता राज्य सरकारच पैसा उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच समृद्धी महामार्गाचं काम लवकरात लवकर सुरू करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीचत समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ही तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असल्याचंही त्यांनी नमूद केले. तसेच १० रुपयांत थाळी ५० ठिकाणी आधी सुरु करण्यात येणार आहेत. शिव भोजन देणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारले जाणार आहे. राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.