
मुंबई: मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर आणि सीएसएमटी चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. विक्रोळी स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज, शनिवार मध्यरात्रीनंतर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर उद्या, रविवारी कोणताही ब्लॉक असणार नाही. सोमवार-मंगळवारी वांद्रे यार्ड टर्मिनसच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार असला तरी यामुळे लोकल फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.






