
मुंबई: काँग्रेसने आज ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून त्यात पत्रकार युवराज मोहिते यांची गोरेगावमधून तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने कराड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.








