महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा पूर्ण. राज्यात एकूण सरासरी साठ टक्के मतदान शेवटच्या टप्प्यात सत्तावन टक्के मतदान.

देशाच्या लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व अठेचाळीस मतदार संघासाठीची मतदान प्रक्रीया पूर्ण झाली असून आता वेध लागले आहेत तेवीस मे च्या निकालाची.  राज्यात चार टप्प्यात पार पडलेलया मतदान प्रक्रीयेत एकूण 60.68 टक्के मतदान झाले असून आज शेवटच्या टप्प्यात 57 टक्के मतदान झालयाची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

कडक ऊन आणि सलग आलेलया सुट्टी मुळे मतदानावर फरक पडलयाचे जणवले. यंदाच्या मतदानाचे वैशिष्टै म्हणजे समाजातील वरच्या थरातील मतदारांनी बजावलेला हक्क लक्षणीय होते. सिलेब्रेटीज आणि सिनेस्टार यांनी मात्र मतदानासाठी हाऊस्फुल्ल गर्दी केली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, उध्योगपती मुकेश अंबानी, बॉलिवूड लिंजड अमिताभ बच्चन, अभिनेत्री कंगणा राणावत, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान या सगळ्यांनी आप आपलया कुटूंबासोबत मतदान केले. याच बरोबर सलमान खान , टायगर श्रोफ , आमिर खान त्याची पत्नी किरण राव , माधूरी दिक्षीत, संजय द्त्त , प्रिया दत्त, पुनम महाजन, राहूल महाजन, करीना कपूर, प्रियांका चोपडा, दिया मिर्झा , डेव्हिड धवन तसेच वरूण धवन आदि कलाकारांनी मतदान केले.

राज्याचा विचार करावयाचा झालयास असे समजते की  महाराष्ट्रात ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा चांगले मतदान झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक बाह्त्तर टक्के मतदान नक्षलग्रस्त गडचिरोली जिलह्यात झाले तर  सर्वात कमी म्हणजे अवघे चवेचाळीस टक्के मतदान झालयाची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आश्विनी कुमार यांनी दिली.