‘तुला पाहते रे’ रंगतदार वळणावर

‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रेक्षकांना लवकरच मालिकेत अजून एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. विक्रांत सरंजामे हाच खरा गजा पाटील आहे हे लवकरच ईशाला समजणार आहे असं दिसतंय.

तुला पाह्ते रे हि झी मराठी वर सुरु असलेली मालिका रंगतदार वळणावर आली असून विक्रांत सरंजामे हाच खरा गजा पाटील आहे हे ईशाला समजणार आहे. हे सत्य ईशाला समजल्यावर तीचा या गोष्टीवर विश्वास बसणार का ? विक्रांत स्वत:ला वाचविण्यासाठी काय व्युहरचना रचणार ?

आता  मालिकेत लवकरच राजनंदिनीची म्हणजेच शिल्पा तुळसकरची एंट्री होणार आहे. राजनंदिनी नेमकी कोण आहे ? तीचे आणि विक्रात सरंजामे यांचे पुर्वाश्रमीचे काय नाते आहे ? विक्रांत सरंजामेच्या बंद ख़ोलीमध्ये  नेमक काय रह्स्य दडलयं ? या सर्व प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना येणा-या काही महीन्यात मिळेल.