
निवडणुकीचे वारे सुरु झाले, प्रचार सुरु झाला आणि काही भागात निवडणूक पार पडलया,आपलया महाराष्ट्रातही आज चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणूक पार पडली. राज्यात साधारण सरासरी पंचावन्न ट्क्के मतदान पार पडले. मुंबईमध्येसुध्दा सरासरी बावन्नच्या आसपास मतदानाचा ट्क्का होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाचे प्रमाण अधिक होते. असो पण या निवडणूकीत प्रचाराने सर्व स्तर गाठले. अगदी चड्डीपर्यंत प्रचार पोहचला. पण ख़-या अर्थाने महाराष्ट्रात वादळ निर्माण केल ते वन मॅन आर्मी राज ठाकरे यांनी. 2014 मधील निवडणूकीत मोदींना डोक्यावर घेतले होते तर 2019 मध्ये त्याच ऊचललेलया मोदींना, धरुन आपटायला निघाले आहेत. देशातच नव्हे कींबहूना जगात असे एकमेव उदाहरण असावे की ज्याचा पक्षाचा एकही उमेदवार नसताना सत्ताधारी पक्षाला धुळ चारायला निघाला आहे. प्रत्येकजण एकमेकावर दोषारोप करून जनतेला मुर्ख करण्यात गुंतले होते. त्यांना हे माहीत नाही जनता सबकुछ जाणती है . . .
ख़रच राज ठाकरे ज्याप्रमाणे बोलत आहे त्याप्रमाणे मोदी सरकार पाच वर्ष ख़ोट बोलत राहीले आणि काहीच काम केले नाही ? जनतेला मुर्ख़ बनविने एवढं सोप आहे ? पाच वर्षात देशाची काहीच प्रगती झाली नाही ? जर नाही तर मग ज्या मोदींच सुरुवातीच्या काळात भरभरून कौतुक केल त्या मोदींना तेव्हाच जाब का नाही विचारला ? निवडणूकीच्या काळातच का साक्षात्कार झाला की मोदी ख़ोट बोलत आहेत हा साक्षात्कार झाला ? अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूका झालया, नगर पालिकेच्या निवडणूका झालया त्यात का नाही आवाज ऊठविला ? का शांत बसले ? या सगळ्या निवडणूकीत आपलया पक्षाची खरी ताकत कळली आणि मग पक्षाला नवसंजीवीनी मिळण्याकरीता योजनाबद्ध केलेला हा डाव आहे.
राबविलेलया काही योजनांबाबत व्हीडीओ क्लीप्स दाख़वून सर्वच ख़ोटं आहे अस कस म्ह्णू शकतो ? तुम्ही डीजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली क्रांती कशी नाकारु शकता ? स्वछ भारत अभियानमुळे स्वछतेबाबत जागृत झालेलया समाजाबद्द्ल तुमचे काय मत आहे ? विविध सरकारी योजना राबविताना ट्क्केवारीची द्लाली बंद करून लाभार्थींना थेट अनुदान त्यांच्या ख़ात्यात जमा करून कितीतरी लोकांना लाभ मिळवून दिला असल्याबद्द्ल का नाही बोलत ? जगभरात भारतीयांबद्द्ल निर्माण झालेल्या आदाराबद्द्ल भारतीयांच्याकडे बघण्याच्या द्रुष्टीकोन बदलला या बद्दल गप्प का ? असे किती तरी प्रश्न उपस्थित होतात. सोयीनुसार भूमिका बदलणे हे सगळ्याच राजकीय पक्षांचे वैशिष्ट्य आहे यात वादच नाही परंतु अगदी 360 डीग्रीमध्ये वळण घेणे म्हणजे मतदारांना मुर्ख़ बनवुन आपली पोळी भाजून घेणे हाच उद्देश असतो. फरक ऐवढाच की राज ठाकरे यांचा नेहमीप्रमाणे अचूक टाईमिंग. ये लाव रे मिशन यशस्वी होत आहे असे वाटत असताना अगदी शेवटच्या दिवशी भाजपाने पत्रकार परिषद घेवून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे येणारा काळच ठरवेल.
भाजपा आणि शिवसेनेने पाच वर्ष एकमेकांवर शिंतोडे उडवून जनतेला झुलवत ठेवले. तस पाहायला गेल तर भाजपाने शासन केले आणि शिवसेनेने विरोधी पक्षाची भुमिका बजावली. सत्तेत राहून गरज पडेल तेव्हा स्वत:च्याच सत्ताधारी भागिदारावर वेळ पडली तेव्हा आवाज ऊठविला. काहीवेळा ही भुमिका दुपाट्टीपणाचीही म्हणता यईल परंतु विरोधी पक्षाने तरी कुठे त्यांची जाबाबदारी चोख पार पाडली ? प्रत्येकजन आप आपले घोटाळे लपविण्यात आणि ईडीची कारवाई टाळण्यात धडपडत होते. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची संधीच मिळाली नाही.?
राहिला प्रश्न कॉंग्रेसचा आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा, त्यांनी संपूर्ण पाच वर्ष विरोधी पक्ष म्हणून जे कार्य करायला हवे होते ते केले नाही. निवडणूकीच्या तोंडावर आघाड्या करून फ़क्त निवड्णूकीच्यावेळी पुन्हा तेच जाहीरनामे प्रसिद्ध करून जनतेला मुर्ख बनवू शकत नाही. गरीबी हटवू, गरीबांना वार्षिक बाह्त्तर हजार अनुदान देऊन न्याय करू , काम न करता बसून ख़ायची सोय करू आणि इमानेइत्तबार करभरणा-या सामान्य जनतेवर अन्याय करू. कोणाचा कोणालाच पत्ता नाही. आम जनतेला काय हवे आहे ? कोणालाच जाणून घ्यायचे नाही. प्रत्येकाला जुमल्यावर ईमले बांधण्यात रस आहे. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून त्यांना मुर्ख बनविने हेच सर्व राजकीय पक्षांची मनिषा दिसून येते. A











