
नवी मुंबई: नवी मुंबईत राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रथमच नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्री शक्तीचा “जिजाऊच्या लेकी” हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
वकील, डॉक्टर, समाजसेविका, शिक्षक, पत्रकार आणि उद्योजिका असे अनेक यशस्वी महिलांना “जिजाऊच्या लेकी” हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. अशा प्रकारचा कार्यक्रम नवी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जुईनगर भागातील शाखेच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई प्रदेशाध्यक्ष श्री गजानन काळे, तसेच मनसेचे पदाधिकारी श्री अक्षय भोसले, सौ. अनिता नायडू, मयुर कारंडे, प्रसाद घोरपडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
प्रगती फौंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ सिद्धिताई किरण राणे यांना समाजसेवा आणि यशस्वी महिला उद्योजिका म्हणून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी मनसे सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागिकांनी गर्दी केली होती.






