नाहीतर ठाकरे राजीनामा देतील – गडाख

अहमदनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवासा तालुक्याच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. गडाख म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांचे आभार मानावेत. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला नसता, तर हे दोन्ही पक्ष विरोधी बाकांवर दिसले असते. आता ग्रामीण भागातील सरकार सत्तेत आले आहे. शहरातील सरकार गेले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्यासाठी बंगले कशाला पाहिजेत, अशी विचारणा करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या मंत्रिमंडळातील रोज एक मंत्री रुसतो आहे. बंगला नीट मिळाला नाही, खाते नीट मिळाले नाही, यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू असतात. हे कुठेतरी थांबायला हवे, अशी अपेक्षाही गडाख यांनी यावेळी व्यक्त केली.