तान्हाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाठला १०० कोटींचा टप्पा

मुंबई: तान्हाजी हा अजय देवगण अभिनित चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

दर दिवशी एक नवा टप्पा ओलांडणाऱ्या या ऐतिहासिक पटाने आता आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी गुरुवारी ट्विट करत ‘तान्हाजी’च्या कमाईचे नवे आकडे सर्वांसमोर आणले. शंभर कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आता ‘तान्हाजी’चाही समावेश झाला आहे. 

सहाव्या दिवशी ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाने १६.७२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. परिणामी तान्हाजीच्या कमाईचे आतापर्यंतचे आकडे हे शंभर कोटींच्या पार पोहोचले. सध्याच्या घडीला हाती असणाऱ्या माहितीनुसार अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने १०७.६८ कोटींची कमाई केली आहे.