आरोग्य विज्ञान शाखा अभ्यासक्रम विषयी थोडक्यात

आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी नीट 2019ची सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा नुकतीच पार पडली देशभरातून अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ही परीक्षा देत असतात. नीट 2019चा निकाल जाहीर झाल्यानंतर एम बी बी एस , बी एच एम एस, बी ए एम एस, बी एस्सी नर्सिंग, बीडीएस सहित सर्व वैधकीय क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू होते. यासाठी विध्यार्थी आणि पालक यांना प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.

नीट चा निकाल लागल्यानंतर राज्यातील विध्यार्थ्यानी नावं नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर विध्यार्थ्यानी भरलेल्या माहितीच्या आधारे प्रोव्हिजनल मेरिट क्रमांक मिळतो. यानंतर भरलेल्या माहितीच्या आधारे सत्यता तपासणी साठी प्रत्येक विध्यार्थ्याच्या कागदपत्राची तपासणी केली जाते.

नावनोंदणी करताना अर्ज ऑनलाइन पद्धतीने नोंदला जातो. शासनाच्या www.dmer.org या संकेतस्थळावर सूचना व वेळापत्रक जाहीर केले जाते. विभागीय कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली जाते. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असे विभागीय कार्यालय आहेत. नोंदणी केलेल्या विध्यार्थ्याच्या संख्येवर कागदपत्रांची तपासणी दोन किंवा तीन टप्प्यात राबविण्यात येते मागील वर्षी सत्तरहजार विध्यार्थ्याच्या कागदपत्रं तपासणी करण्याकरिता दोन टप्प्यात तपासणी करण्यात आली. बीडीएस आणि एमबीबीएस शाखेतील प्रवेशाची फेरी प्रथम होते. विध्यार्थ्याना स्वतः हजर राहून सर्व मूळ कागदपत्रे व झेरॉक्स सेट सादर करून तपासणी करावी लागते. राखीव जागा किंवा आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्यास विध्यार्थ्यास खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागतो.

कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर सुधारीत गुणवत्ता यादी जाहीर केली जाते ऑनलाइन पध्दतीने पंसतिक्रम योग्य त्या कालावधीत नोंदविले जातात व त्या आधारे प्रथम एमबीबीएस, बीडीएस शाखेतील प्रवेशप्रक्रिया सुरू होते आणि नंतर फिजिओथेरपी, नर्सिंग यांचा क्रम लागतो. त्यानंतर नोंदविलेल्या पंसतिक्रमानुसार पुढील फेऱ्यात बीएम एस सह उर्वरित शाखांचे वाटप अनेक फेरयांच्या माध्यमातून केले जाते.