विवेक ओबेरॉयचा पी एम नरेंद्र मोदी अखेर प्रदर्शित

मुंबई: लोकसभा निवडणुकीत आचारसंहितामुळे प्रदर्शित होवू न शकलेला विवेक ओबेरॉयचा पी एम नरेंद्र मोदी अखेर काल प्रदर्शित झाला. बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पी एम नरेंद्र मोदी या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदीची भूमिका केली आहे. चर्चा अशीही आहे की, सध्या विवेक ओबेरॉय आक्रमकपणे प्रमोशन करीत आहे आणि त्यामुळेच त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. याबद्दल विवेकने पोलिसांना कळविले असून पोलिसांनी विवेकच्या सुरक्षेत वाढ केली आहे.