यंदा वैद्यकीय पदव्युत्तर कोर्सेसमध्ये मराठा आरक्षण नाही : हायकोर्टाचा निर्णय May 2, 2019 शेअर करा Facebook Twitter Google+ WhatsApp Email वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गवारीत (एसईबीसी) १६ टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.