कोरोना व्हायरस अनैसर्गिक, मानव निर्मित असू शकतो; संपूर्ण मानवजातीला धोका, सावध रहा।

मागील तीन महिन्यापासून चीनच्या वूहान प्रांतातून पसरलेला कोरोना (Covid19) हा विषाणू चीनमध्ये धुमाकूळ घालून संपुर्ण जगभरात हातपाय पसरत आहे. आजच्या तारखेला 70 पेक्षा जास्त देशात या व्हायरसने प्रवेश केला आहे. सध्यातरी कोरोनावर कोणताच उपाय किंवा औषधे उपलब्ध नाहीत म्हणजेच जर का या विषाणूची लागण झाली तर मृत्यू अटळ आहे. भरतासाहित संपूर्ण जगभरात यावर संशोधन सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही देशाला यात यश आले नाही. सध्यातरी कोरोनाची लागण होवू नये म्हणून काळजी घेणे (Preventation) हा एकमेव उपाय आपल्या हातात आहे.

अधिकृत आकडेवारी नुसार चीनमध्ये 80,000 हुन अधिक लोक कोरोना ग्रस्त आहेत आणि 3000हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आतातर इराण, इटली, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, मलेशिया, फ्रांस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आदि देशासाहित भारतातही प्रवेश केला आहे. भारतात पाच पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. भारताची वेस ओलांडून तो अगदी आपल्या महाराष्ट्रात एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे.

प्रथमदर्शनी कोरोना व्हायरस आपत्ती वाटत असली तरी यामागे घातपात असू शकतो. WHO ने कोरोनाला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. परंतु याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चौकशी आणि संशोधन होणे आवश्यक आहे. कदाचित हा जैविक पद्धतीचा अवलंब करून हल्ला असू शकतो. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरेकी तंत्रज्ञान विकसित करून वेगवेगळ्या मार्गाने हल्ला करण्याचे मनसुबे आखत असतात. कदाचित ही अतिशयोक्ती ठरू शकते परंतु शक्यता नाकारता येत नाही. क्रीणोत्सर्ग (Radiation), रासायनिक (Chemical) आणि जैविक (Biological) शस्त्र म्हणून वापर करून दहशतवादी हल्ला करीत असतील तर हे संपुर्ण जगाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे. यापुढील युध्द कदाचित बंदुका, बॉम्ब, अणुबॉम्ब, रणगाडे यांच्या मदतीने न लढता जैविक विषाणूचा वापर करून लढली जाऊ शकतील. त्यामुळे यावर सगळ्या जगातील राष्ट्राने एकत्र येऊन यावर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घ्यावा.

आज कोरोनामुळे चिनचं संपूर्ण कंबरड मोडलं. देशाची आर्थिक परिस्थिती मंदावली ही परिस्थितीअशीच राहिली तर चिनचं अस्तिव धोक्यात येईल आणि संपूर्ण जगासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे. तुम्ही जर का पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल जगातील आर्थिक महासत्ता कोरोनाचे टार्गेट आहेत. चीन, जपान, इटली, फ्रांस, अमेरिका आणि आता भारत. हा सगळा घटनाक्रम पाहता संशयाला जागा निर्माण होते की कदाचित हा दहशतवादी जैविक हल्ला असेल तर? हा चीन निर्मित biological weapon चीनवर उलटलं तर नाही ना? की या मागे आंतरराषट्रीय पुरस्कृत दहशतवादी प्लान आहे? कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खरंच संशोधनं आणि तपास दोन्ही गरजेचं आहे.

आपला भारत देश यासगळ्या आव्हानासाठी कीती सज्ज आहे? अशी एखादी आपत्ती आपल्या देशात किंवा राज्यात आल्यास आपण या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समर्थ आहोत का? आज तेलंगणा, आग्रा, नोएडा, राजस्थान याठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आणि हा रोग पुढे अजून हातपाय पसरायला सुरूवात करणार हे नक्की. चांगली गोष्ट अशी आहे की, आपल्याकडे आता तीव्र उन्हाळा सुरू होणार आहे त्यामुळे काही प्रमाणात कोरोनावर आपण नियंत्रण मिळवू शकतो परंतु पुढे पावसाळा आहे आणि जर का आपण आता कोरोणावर नियंत्रण नाही मिळवू शकलो तर मात्र पुढे पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होवू शकते कारण दमट आणि थंड हवामान कोरोनासाठी पोषक असते. आपली आरोग्य यंत्रांना आणि वैद्यकीय सेवा किती सक्षम आहे? अशा परिस्थितीत सरकारवर विसंबून न राहता नागरिकांनीही खबरदारी घ्यावी आणि या जीवघेण्या कोरोना (Covid19) ला दूर ठेवावे. सर्दी, खोकला, डोकेदुखी नेहमीचं न समजता वेळीच डॉक्टर उपचार घ्यावा, शिंका आल्यास नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर घ्यावा, सर्दी पडसे असणाऱ्या रुग्णाचा संपर्क टाळावा, गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, बाहेरचे उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाऊ नये, पॅकेट फूड टाळावे, परदेश वारी टाळावी, मांसाहारी अन्न भरपूर प्रमाणात शिजवून खावे, कच्च मांस टाळावे , घर व परिसर स्वच्छ ठेवणे इत्यादी गोष्टी आपल्याला सहज करता येणार आहेत आणि कोरोनाला रोखू शकू.

सरकारी स्तरावर केंद्र आणि राज्य सरकार तसेच विविध महानगर पालिका, नगर पालिका, ग्रामपंचायत नागरिकांसाठी उपाय योजना आखत आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने तोंड दिले पाहिजे. संकट कसेही असो नैसर्गिक आपत्ती किंवा मानव निर्मित आपत्ती शेवटी प्रश्न मानवाच्या अस्तित्वावर आला आहे तेव्हा सगळ्यांनी सावध रहा.

हा लेख अफवा पसरविण्यासाठी नाही तर भविष्यातील संकटबाबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे. अशी संकट भविष्यात येवू शकतात तेव्हा आपण सर्वांनीच या साठी दोन हात करण्यासाठी तयार राहायला हवे. यासंबंधी काही यू ट्यूब व्हिडिओ यालेखात समाविष्ट केले आहेत ते जरूर पहा.