भारताला मालिका विजयाची संधी

न्यूझीलंड: न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना उद्या होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताला मालिका जिंकण्याची संधी आहे. इडन पार्कवर झालेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले २०४ धावांचे आव्हान भारताने ६ चेंडू राखून तर दुसऱ्या सान्यात १५ चेंडू आणि ७ विकेट राखून पार केले होते. आता हॅमिल्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच विराट आणि कंपनीचा प्रयत्न असेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना बुधवारी २९ जानेवारी रोजी होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.