
पालघर: आजच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रगती फौंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दादर कोपरा गावात पोषक आहार फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले.

आदिवासी भागातील नागरिकांना सकस आहाराची समस्या भेडसावत असते आणि त्यामुळे याभागातील मुलं कुपोषणाचे बळी ठरत असतात, नेमकी हीच बाब हेरून प्रगती फौंडेशन मार्फत तसेच इंडीया बुलच्या सौजन्याने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दादर कोपरा पाड्यात पोषक आहार खाद्यपदार्थांची पाकीट वितरित करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे विभागीय अधिकारी श्री प्रणय ढमाळ आणि सहकारी पथक उपस्थित होते.







