इंदुरीकर महाराजांविरुद्ध तक्रार दाखल, अनिस आक्रमक

इंदुरकर महाराजांचं विधान चुकीचं – चंद्रकांत पाटील

अहमदनगर: महिलाच्या विरोधात किर्तन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांविरोधात अंनिसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी तक्रार केली आहे. महिलांविरोधात किर्तन करणारे… खरं तर याला किर्तन म्हणावं की नाही असा प्रश्न पडत असल्याचं अविशान पाटील झी चोवीस तासशी बोलले. महिलांबाबत आक्षेपार्ह हावभाब आणि विधान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

महाराजांनी गर्भधारणेविषयी सम आणि विषम संख्यांच गणित किर्तनात मांडल होतं. यामध्ये मुलाकरता सम संख्येच्या तारखेला संबंध ठेवावे आणि मुलींकरता विषम संख्येच्या तारखेला संबंध ठेवावं अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातून इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका होत आहे. 

इंदुरीकर महाराजांनी महिलांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. अंनिसना इंदुरीकर महाराजांविरोधात अहमदनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अंनिसने इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.  दरम्यान इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तक्रार दाखल केली आहे. तृप्ती देसाई यादेखील इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक असून त्यांनी देखील तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

इंदुरीकर महाराजांचं विधान चुकीचं असून त्याच समर्थन करत नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.