
निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने राज्य सरकार मराठा आरक्षित विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी विशेष वटहुकूम काढणार असल्याचे राज्य सरकार मार्फत सांगण्यात आले. त्यामुळे 296 मराठा विध्यार्थ्याच्या पाठिशी राज्य सरकार उभे असल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकार विध्यार्थ्याच्या प्रवेशाबाबत वटहुकूम काढून नागपूर खंडपीठाने दिलेल्या मराठा आरक्षण बाबत निर्णयातून मार्ग काढणार आहे. यामुळे मराठा समाज आरक्षित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे.






