
मोबाईल ही आता काळाची गरज बनलीय.मोबाईल बंद असेल तर आपण हैराण होतो.पण, तुमच्या हातातून मोबाईल जमिनीवर पडला तर आता टेन्शन नाही.कारण, आता कितीही वेळा मोबाईल हातातून खाली पडला तरी तो सुरक्षित राहू शकतो.चक्क मोबाईल पडल्यावर फूटू नये म्हणून स्मार्टफोन एअरबॅग तयार करण्यात आलीय.अलिशान गाडीचा जेव्हा अपघात होतो, त्यावेळी एअर बॅग उघडते तशाच प्रकारे मोबाईलसाठी हे कव्हर तयार करण्यात आलंय.मोबाईल कितीही वेळा खाली पडला तरी त्याला काही होणार नाही.मोबाईल पडला की मोबाईलला लावलेलं कव्हर आपोआप उघडतं आणि मोबाईल खाली आपटण्यापासून वाचवतं.अनेकजण महागडे मोबाईल वापरतात त्यामुळं त्यांच्यासाठी खास हे कव्हर बनवण्यात आलंय.हे कव्हर जर्मनीच्या आलेन युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर फिलिप फ्रेंजेल यांनी बनवलंय.










