
नवी मुंबई (प्रतिनिधी ) : शनिवार दिनांक 07 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुईनगर विभागातर्फे खेळ पैठणीचा व हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला मनसे महिला सेना सरचिटणीस शालिनीताई ठाकरे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे ह्यांनी प्रमुख उपस्थिती लावली हा कार्यक्रम जुईनगरच्या तीन प्रभाग मिळून घेण्यात आला प्रभाग क्रमांक 82 मनिषा सुर्यकांत गोडसे प्रभाग क्रमांक 83 अनिता नेटके नायडू तसेच प्रभाग क्रमांक 84 अनुष्का अभिजित देसाई या महिला पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रभाग क्रमांक 82 मधील मनिषा सुर्यकांत गोडसे याना त्यांच्या शिक्षकांनी मिळून अनामत रक्कम 10000 रुपयेचा धनादेश शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला या शिक्षक मंडळातर्फे भाऊसाहेब आहेर आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते लोकवर्गणीतून निवडणूक लढविणार्या मनसेच्या मनिषा सुर्यकांत गोडसे या नवी मुंबईतील पहिल्या उमेदवार ठरल्या असल्याने नवी मुंबईत त्यांच्या नावाची चर्चा आहे तसेच विद्या दान करणाऱ्या शिक्षकानी असा प्रकारचा पायंडा पाडत असल्याने त्यांचे ही कोतुक होत आहे






