
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकींचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. 542 मतदार संघातील उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. 23 मे रोजी होणार्या मतमोजणींनंतर कोणाचं सरकार येईल हे स्पष्ट होईलच. परंतु मतदान संपताच विविध संस्थाचे सर्वे जाहीर करण्यात आले आणि जवळपास सर्वच एक्जिट पोल जनमत चाचणीतून मोदी सरकार परत एकदा सत्तेवर आरुढ होईल असेच चित्र दिसत आहे. सर्व वाहिन्या आणि संस्था यांची जर का सरासरी काढली तर असे लक्षात येते की भाजप प्रणीत एन डी ए ला 291 तर कॉंग्रेस प्रणीत यू पी ए ला 125 आणि इतर पक्षांना 124 जागा मिळतील. थोडक्यात काय तर सर्व संस्थाच्या जनमत चाचणीची सरासरी काढली तर भाजप बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापनेचा दावा करेल असेच स्पष्ट होत आहे.
भाजप सरकार परत एकदा सरकार स्थापन करेल या एक्जिट पोलच्या अंदाजांनी राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ माजवली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी विविध राजकीय नेत्यांची भेटी गाठी घेवून मोर्चे बांधणी सुरू केली असून शरद पवार यांनी फोन सत्र सुरू केलेले दिसत आहे.
जवळपास सर्वच राजकीय विरोधी पक्षांनी एक्जिट पोलचे दावे फेटाळून लावले असून सत्तास्थापनेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आन्ध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी, राहुल गांधी, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेतली असून भाजप विरोधंकाची मोट बांधण्यासाठी पुढे सरसावले आहेत. सुपर पावर शरद पवार हेही तिसर्या मोर्चाची मोट बांधण्यासाठी पुढे सरसावले असून अनेक राजकीय नेत्यांना गळ टाकण्यासाठी सुरुवात केली आहे. एक्जिट पोल फेल ठरल्यास तिसर्या मोर्च्याची चाचपणी केली जात आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून संभाव्य परिस्थित काय व्यूहरचना असावी याचा अंदाज घेत आहेत. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी एक्जिट पोल विषयी शंका उपस्थित करून मतदान यंत्रणेवरच शंका उपस्थित केली आहे. o






