EXIT POLL EFFECT: शेअर बाजारात जबरदस्त उसळी , रुपया 49 पैशांनी वधारला

मुंबई : वृत्तवाहिनी आणि विविध संस्था यांनी वर्तवलेल्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांमध्ये भाजप प्रणीत सरकार पुन्हा सत्तेत येईल अशी शक्यता वर्तवल्याने शेअर बाजारात तेजीची लाट आली आणि सोमवारी शेअर बाजार तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच एका दिवसात मुंबई शेअर बाजार एक हजार 422 अंशाची उसळी घेवून 39 हजाराचा टप्पा पार केला. दिवसा अखेर शेअर बाजार 39 हजार 352 अंशावर स्थिरावला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक देखील 421 अंशांनी वधारून 11 हजार 828 अंशावर बंद झाला. एक्जिट पोल चाचण्यामध्ये मोदी सरकार पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापनेचा दावा पेश करेल असा अंदाज वर्तवल्याने गुंतवणुकदारांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता. यासगळ्याचा परिणाम सोमवारी चलन बाजारावरही झाला. रुपया डॉलरच्या तुलनेत 49 पैशांनी वधारून 69.74 वर बंद झाला. गुंतवणूकदारांनी एक्जिट पोल चाचण्याचे स्वागत केलेले पाहायला मिळाले. ity51 \lsdlock