शिवसेना विधीमंडळ गट नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांची वर्णी

मुंबई: शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. याचे कारण म्हणजे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यानंतर शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

तसेच सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार राज्यपालांची भेट घेणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाही.