देशात कोरोनाचा दुसरा बळी दिल्लीत

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत कोरोनामुळे वृद्ध महिलेचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या महिलेला कफ झाला होता. याआधी तिला मधुमेह होता. तिचा मुलगा इटलीहून परत आला होता. त्याच्यामुळे तिला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना की मधुमेहामुळे तिचा मृत्यू झाला ? हे अजून स्पष्ट झाले नाही. याआधी काल कर्नाटकच्या कलबुर्गी येथे ७३ वर्षाच्या वृद्धाचा पहिला बळी गेला होता.