कोरोनो चीनमधून एक्झिट . . .

वुहान (चीन) Coronavirus: संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यात चीनमधील डॉक्टरांना यश आलयं. चीनमधील हुबेई या प्रांतातील वुहान शहरातूनच हा जीवघेणा व्हायरस पसरला होता. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत तीन हजारहून अधिक जणांचा बळी घेतला होता. ता वुहान शहरातून कोरोनाचा निपटारा करण्यात डॉक्टरांना यश आल्यामुळं संपूर्ण जगासाठी ही समाधानाची बाब असल्याचं बोललं जातंय.

वुहान शहावर कोरोना नावाचे आलेले काळे ढग आता दूर झाले आहेत. शहरातील डॉक्टरांच्या प्रयत्नां यश आले असून, एक एके पेशंट बरा होत गेला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत अतिदक्षता विभागांचे रुपांतर पुन्हा जनरल वॉर्डमध्ये करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतीने रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील प्रत्येकाने मास्क वापरण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यासाठी मास्क सक्तीचा केला होता. गेल्या काही आठवड्यांत वुहानमधील मास्क घातलेले आरोग्य कर्मचारी हे चित्र नित्याचे झाले होते. आता या मास्कपासून सुटका झाली आहे. एखाद्या इव्हेंटसारखा या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क काढला असून, जगभरात हा व्हिडिओ व्हायरल झालाय. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार चीनमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती सध्या 81 हजार झाली आहे. एकट्या चीनमध्ये 3 हजारहून अधिक जणांचा बळी गेलाय तर, जगातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 हजार 400 झाली आहे.