नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील कॉलेजच्या नव्या इमारतीत आग

नवी मुंबई: नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील कॉलेजच्या नव्या इमारतीत मोठी आग लागली असून ती आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जात आहे. आग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. माहिती अशी मिळत आहे की सदर ईमारत ही कॉलेजच्या हॉस्टेल साठीची असून याईमारतीत थर्माकोल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात आहे.