Corona update: कोरोणाग्रस्त महाराष्ट्रात आकडा 45, कोकणात रत्नागिरी येथेही एक रुग्ण बाधित

मुंबई : मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.

पिंपरी चिंचवडमधील 21 वर्षीय तरुणाने गेल्या काही दिवसात फिलिपाईन्स, सिंगापूर आणि कोलंबो असा प्रवास केला होता. रत्नागिरीतील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, या व्यक्तीने दुबई प्रवास केला होता. तर अमेरिकेहून आलेल्या कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती

  • पुणे – 8
  • पिंपरी-चिंचवड – 11
  • मुंबई – 8
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी- 1