
मुंबई: लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 तास जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, या बैठकीत यावर चर्चा झाली.
संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन, सूचना दुकानदारांनी पाळाव्यात, असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले आहे.






