
मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेत राज्यभरातील ४९२ खासगी रुग्णालये सहभागी असून येत्या एक एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन १००० रुग्णालयांचा समावेश होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.






