भारतीय महिला हॉकी संघाचा दक्षिण कोरियावर 2-1 अशी मात

जींचेऑन : भारतीय महिला हॉकी संघ सध्या दक्षिण कोरियाच्या दौर्‍यावर असून तीन सामन्याची हॉकी मालिका भारतीय महिला हॉकी संघ खेळणार आहे. पाहिल्याच सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दमदार कामगिरी करून द.कोरियावर 2-1 अशी मात केली आणि सर्वांनाच चकित केले. भारताकडून लालरेमसिमी आणि नवनीत काउर यांनी प्रत्येकी एक गोल तर द. कोरिया कडून शिंनने एक गोल केला. मालिका सुरू होण्यागोदर यजमान द. कोरियाचे पारडे जड मानले जात होते. परंतु भारतीय महिलांनी उच्च दर्जाचं प्रदर्शन करून मालिकेत विजयी सलामी दिली.