Corona Update: पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

पुणे:

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून एका 52 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये या कोरोनाग्रस्त रूग्णावर उपचार सुरू होते. सदर व्यक्ती आधीपासूनच फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासलेली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्यक्तीने कोणताही परदेश दौरा केलेला नव्हता. तसे परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात ही व्यक्ती आलेली नव्हती. हा पुण्यातील कोरोनाचा पहिला बळी असून राज्यातील 9वा बळी आहे.

सदर व्यक्तीला 21 मार्च रोजी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणी केल्यानंतर त्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. या कोरोना बाधित व्यक्तीला उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.