स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालिकेत !!

मुंबई:

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार परिश्रमांची बाजी लावत आहेत. राज्यातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राज्याला स्थिरस्थावर करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे स्वतः पुढाकार घेत जबाबदारीने महत्वपूर्ण कामं करत आहेत. त्याचेच एक उदाहरण पाहावयास मिळाले.

मुंबई महानगरपालिके मध्ये आरोग्य विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीसाठी मंगळवारी मुख्यमंत्री पालिकेत दाखल झाले. परंतु यावेळी ट्राफिक पोलिसांसह सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवून पालिकेत पोहचले. नागरिकांना सूचना करत असताना सुरुवात स्वतः पासून करावी लागते व कठीण परिस्थिती जबाबदारीने एका सेनापतीप्रमाणे लढावे लागते, असे रूप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिसून आले.