Corona Effects: सिनेमांना फटका; रणबीरचा ’83’ सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर

मुंबई : जगभरातील आणि देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित ’83’ सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय सिनेमाच्या टीमनं घेतला आहे. 1983 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित 83 हा सिनेमा येत्या 10 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचं जागतिक संकट लक्षात घेता आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.


अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही महत्त्वाची घोषणा केली आहे. ’83’ हा केवळ आमचा सिनेमा नाही तर देशाचा सिनेमा आहे. पण त्यापेक्षा देशाची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. सुरक्षित राहा, काळजी घ्या, आम्ही लवकर परत येऊ, असा संदेश देणारं एक पत्रक रणवीरनं पोस्ट केलं आहे.