किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई:

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांना मुलुंड येथील त्यांचं निवासस्थान निलम नगर येथून अटक करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना अटक करुन मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला भेटण्यासाठी आपण चाललो असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सकाळी ११ वाजता भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या चालले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

“जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांना मारहाण केलेल्या अनंत करमुसे याला भेटण्यासाठी त्याच्या निवासस्थानी जात असताना मुंबई पोलिसांनी मला ताब्यात घेत रोखलं. मी सकाळी ११ वाजता त्याची भेट घेणार होतो,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.