
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करा, अशी शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीतून करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे सध्या राज्य विधीमंडळाच्या दोन्हीपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात कुठल्यातरी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं बंधनकारक असतं.
विधान परिषदेत सध्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या 2 जागा रिक्त आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.






