Corona Update: कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३

कल्याण – येथील कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३ झाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

४३ पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

कुठे किती रुग्ण?

कल्याण पूर्व – ८
कल्याण पश्चिम-८
डोंबिवली पूर्व-२०
डोंबिवली पश्चिम-७
टिटवाळा १

कल्याण डोंबिवलीत रुग्णसंख्या ४३ वर गेली आहे.

सोशल डिस्टन्सिंग, घरात थांबणे, चेहऱ्याला मास्क लावणे, गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे, बाहेर पडताना मास्क लावणे या गोष्टी काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यात आलं आहे.