राज्यात करोनानंतर आता ‘सारी’चं संकट, औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी

औरंगाबाद – राज्यावर सध्या करोनाचं संकट असून त्याचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र कोरोनाचा संकट सामना करताना सध्या एक नवं संकट समोर आलं आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनासोबत सारी चा (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पसरत आहे.

या आजारामुळे औरंगाबादमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये आतापर्यंत १०३ जणांवर उपचार करण्यात आले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुर असताना सारी आजारामुळे त्यात भर पडू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना सारी च्या रूग्णांची माहिती नियमितपणे सादर करण्यास सांगितलं आहे.