15 एप्रिल पासून वाशी एपीएमसी भाजीपाला आणि दाना मार्केट सुरू होणार

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे संचालक महाराष्ट्र राज्याचे मा जलसंपदा मंत्री कामगार नेते श्री शशिकांतजी शिंदेसाहेब,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष व कामगार नेते श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटीलसाहेब, APMC चे संचालक अशोकशेठ वाळुंज APMC चे सचिव चव्हाण साहेब तसेच पोलिस स्टेशनचे डिसीपी व वरिष्ठ अधिकारी निकमसाहेब यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत APMC प्रशासनाच्या विनंतीवरून देशात कोरोना सारखा आजाराने रूद्र रूप पाहून कुठल्याही व्यक्तीला जिवन अवश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये.म्हणून बुधवार दि 15/4/2020 पासून कांदा बटाटा मार्केट चालू करण्यात येईल.

सद्यपरिस्थितीतील बाजार आवारात फक्त 50/50 गाडीची आवक गेटवरून सोडली जाईल.सदर बैठकीला व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी किरण शिंदे,संजय पारिख,सुरेश शिंदे इतर व्यापारी हजर होते.

तसेच APMC च्या आवारच्या आजूबाजूला कोणीही व्यापार केल्यास पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगितले.