ऐन दिवाळीत पावसाळा, क्यार चक्रीवादळाचा परिणाम

मुंबई: यंदा नोव्हेंबर उजाडायला आला तरी पावसाळा संपला नाही असंच म्हणावं लागेल. हवामान खात्याने जरी मान्सून संपला असं जाहीर केलं असलं तरी महाराष्ट्रातला मान्सून इफेक्ट काही अजून संपलेला नाही. महाराष्ट्राच्या किनारपट्टी लागत क्यार चक्रीवादळ घोंगावत असल्याने कर्नाटक पासून कोकण, मुंबईसाहित गोव्यापर्यन्त मान्सून इफेक्ट परत एकदा तयार झालं आहे.
२४ ऑक्टोबर ला चक्रिवादळ क्यार हे गोवा किंवा कारवार किंवा रत्नागिरी च्या किनारयाकडे सरकायला सुरूवात केेली, २६ तारखेपर्यंत हे चक्रिवादळ मोठे होईल त्यामुळे सध्याचा पडत असलेला पाऊस तिकडे खेचला गेला आहे. म्हनुण पाऊस पुढील चार दिवस कमी होईल. व त्यानंतर म्हणजे २६ आक्टोबर ला संपुर्ण कोकण, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापुर मध्ये मुुुुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल. सहलीसाठी पुढील आठ दिवस कोकण, गोवा, गोकर्ण, मुंबई या ठिकाणी मानसूूून इफेक्ट असेल. 30 ऑक्टोबर ला चक्रिवादळ पुर्ण प्रभावात असणार आहे. दमण पासून मंगलोर पर्यंत सागरकिनारी रहानाऱ्यया सर्व नागरिकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. . कारण हे वादळ खुप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. शुक्रवार पर्यंत पाऊसाचे प्रमाण कमी होईल पण त्यानंतर चक्रिवादळा नुसार पावसाची तिव्रता अधिक असु शकेल व २६ ते ३१ तारखे पर्यंत पाऊस असेल.

त्यामुळे ऐन दिवाळीत पावसाळा अनुभवायला मिळणार आहे.