HSC Maharesult 2019 : बारावीचा निकाल आज.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharshtraeducation.com

बोर्डाने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती.

बीएसएनएल मोबाईल धारकांनाही हा निकाल त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. खालीलप्रमाणे मजकूर टाईप करावा.

MHHSC{Space}{Seat no} असे टाईप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस करावा.