
मुंबई : आजच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाचा बारावीचा निकाल हा 90.25 टक्के लागला आहे. या वर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वाधिक निकाल हा कोकणातील असून 93.23 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूरचा असून तो 81.51 टक्के इतका लागला आहे.
सैराट फेम आर्चीनेदेखील बारावीची परीक्षा दिली होती. आर्चीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, आता आर्ची बारावीची परीक्षा पास झाली आहे. तुम्हाला तिचे टक्के वाचून नक्कीच आनंद होणार आहे. आर्चीला म्हणजेच रिंकु राजगुरुला बारावीत 82 टक्के मार्क्स मिळाले आहेत. या निकालाने रिंकुचे कौतुक होताना दिसत असून ती पुन्हा चर्चेत आली आहे. रिंगू राजगुरुला मराठीत 86, भूगोलमध्ये 98, इतिहासात 86, राज्यशास्त्र विषयात 83, अर्थशास्त्रात 77 तर पर्यावरण स्टडी विषयात 49 गुण मिळालेत. तिला एकूण 7 विषयात 650 पैकी 533 गुण मिळाले आहेत.











