सामाजिक संस्था प्रगती फाऊंडेशन मार्फत गरजूंना मोफत अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संस्थेमार्फत कोरोना विरूद्ध लढण्यासाठी विविध उपक्रम

मुंबई: जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू भारतातही दाखल होवून सर्व जीवनमान ठप्प करून टाकलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून 3 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे.

नागरिकांना सोशिअल डिस्टसिंगचे पालन करण्याचे जाहीर आव्हान प्रशासनामार्फत वारंवार केले जात आहे. या लाॅकड‍ाऊनमुळे गोरगरीब लोकांचा अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा उदनिर्वाह बाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी केंद्र व राज्य सरकारने विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना पुढे येवून अशा गरजू लोकांना सहाय्य करण्याचे आवाहन केले होते.

सरकारच्या आवाहनास अनेक संस्था प्रमाणे नवी मुंबईतील राज्यस्तरावर कार्यरत असणारी सामाजिक संस्था प्रगती फाउंडेशनने ही कोरोनाशी लढा देण्यासाठी या संकट काळात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलन करणे, गरजूंना मोफत अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, आणि डॉक्टर जे देवदूत बनून हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत त्यांना पी पी ई किट्स मास्क उपलब्ध करून देणे इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश आहे.

संस्थेमार्फत कुर्ला पश्चिम येथील जवळपास साठ गरजू कुटुंबांना मोफत अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, पाच किलो तांदूळ, दोन किलो साखर, एक किलो तुर डाळ आणि एक किलो रीफाईंड खाद्य तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.

संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष किरण राणे, कार्यकारी संचालक सौ. सिद्धी राणे (ढमाळ) , सल्लागार समितीचे सदस्य प्रो. आर एस एस मणी, अडवोकेट सलीम पटेल, व्यवस्थापक राकेश वाणी आणि संस्थेचे सदस्य व स्वयंसेवक प्रणय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. प्रणय धामाळ यांनी स्वतः उपस्थित राहून स्थानिक श्री दत्तगुरु सेवा मित्र मंडळ व मंडळाच्या सेवेकरीच्या मदतीने सोशिअल डी श्टेंसिन चे पालन करून कुर्ला पश्चिम यथील चाळीतील प्रत्येक घरी जाऊन अन्न धान्याचं वाटप केले. याकरिता दानशूर के सुब्रमण्यम यांचेही सहाय्य संस्थेला लाभले.

संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे व संस्थेसाठी अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. संस्थेमार्फत दानशूर व्यक्ती व दानशूर संस्थांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून अशा प्रकारची मदत अधिकाधिक लोकापर्यंत पोचविता येईल. संस्थेकडे अनेक विभागातून मदत करण्याकरिता विनंती येत आहे. याकरिता संस्थेने खालील प्रमाणे ऑनलाईन डोनेशन प्लॅटफॉर्म निर्मिती केली आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या साईट वर जावून भरघोस मदत करावी व संस्थेच्या या लोकोपयोगी उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://www.ketto.org/fundraiser/india-fights-against-corona-help-for-homeless?utm_source=internal&utm_medium=whatsappShare&utm_campaign=india-fights-against-corona-help-for-homeless&utm_content=743c6bc81ad82ca96e582837cb603712&shby=1