युजीसीच्या मार्गदर्शनानंतरच विद्यापीठांच्या परिक्षांविषयी निर्णय घेणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेणे किंवा कसे याविषयी युजिसीचे मार्गदर्शन आल्यानंतरच निर्णय घ्यावा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. श्री. सामंत यांनी आज व्हिडीओ कॉन्फर्न्सच्या माध्यमातून राज्यातील सर्व अकृषि विद्यापिठाच्या कुलुगुरूंशी चर्चा केली. यावेळी शिक्षण संचिव सैरभ विजय यांच्या सह उच्च शिक्षण संचालक व सर्व अकृषि विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.


युजीसीच्या मार्गदर्शन सुचनांनंतर परिक्षांचे वेळापत्रक तयार करावे असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ऑनलाईन परिक्षा घेण्याबाबत सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. तसेच सध्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन परिक्षांविषयी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याच्या दृष्टीने सर्व कुलगुरूंनी आपल्या स्तरावर युजीसीच्या मार्गदर्शक सुचनांनंतर परिक्षा कशा पद्धतीने घ्यायचा याचा निर्णय घेण्यात येईल याविषयी प्रसिद्दी करावी. या मार्गदर्शक सुचनांसोबतच सध्या राज्य स्तरीय समितीने तयार केलेला आराखडा यांची योग्य ती सांगड घालून परिक्षांचे वेळापत्रक व पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे.

ऑनलाईन परिक्षा घेण्याविषयी काही अडचणी असल्यामुळे शक्यतो ऑफलाईन परिक्षा घेण्याच्या दृष्टीने विद्यापिठांनी तयारी करावी. परिक्षा जरी ऑनलाईन होणार नसल्या तरी ऑनलाईन टिचींगची सर्व तयारी विद्यापिठींनी त्यांच्या स्तरावर करावी. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवता येतील. ऑनलाईन परिक्षा नाही तर ऑनलाईन शिक्षणाविषयी आपल्याला निर्णय घ्यावयाचा आहे. ज्या विद्यापिठांचा अभ्यासक्रम 70 टक्के पेक्षा जास्त पूर्ण झाला आहे. त्यांनी परिक्षांसाठी पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाचा समावेश करावा व उर्वरीत अभ्यासक्रम पुढील परिक्षेमध्ये समाविष्ट करावा. मुंबई आणि पुण्याच्या परिस्थितीवर राज्यातील परिक्षांचा विचार करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यापिठाने त्यांच्याकडील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत अशा सूचना श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या