
सायन हॉस्पिटलमध्ये दिल्या किट्स, सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, सोबत इतर सामाजिक उपक्रमही सुरू
Pragatee foundation has responded positively to MARD against their appeal for donations of PPE Kits. PPE kits are sent to the Mumbai’s Sion Hospital.
कोव्हिड 19 म्हणजेच कोरोना या विषाणूंमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोना हातपाय पसरत आहे. खासकरून महाराष्ट्रात किंबहुना मुंबईत तर कोरोनाने आतंक माजविला आहे. सरकार व प्रशासन पूर्ण शक्तिनिशी प्रयत्न करीत आहे. तरीही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे अशात डॉक्टर्स आणि नर्सेस जे हॉस्पिटलमध्ये दिवसरात्र देवदूत बनून आपले कर्तव्य बजावित आहेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशावेळी सरकारने तसेच मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने ही सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते.

मुंबईतील राज्यभर कार्यरत असणारी सामाजिक संस्था प्रगती फाऊंडेशन ही कोरोनाच्या या लढाईत अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. गरजूंना अन्न धान्य वाटप करणे, रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त संकलित करून देणे इत्यादी.

डॉक्टर संघटना मार्ड या संस्थेच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईतील सायन हॉस्पिटल मधील डॉक्टरांसाठी पी पी ई किट्स ची मदत करण्यात आली आहे. सरकार व प्रशासन रुग्णालयांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे तरीही कोरोनाचा उद्रेक प्रचंड असल्याने रुग्णालयामध्ये काही वेळा वैद्यकीय साहित्याचा तुडवडा भासत आहे. हीच बाब लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने पी पी ई किट्स हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यातील पी पी ई किट्स वितरित करण्यात आले असून सदर किट्स हे हाफकिन सर्टिफायीड आहेत. डॉक्टरांच्या मागणीनुसार दर्जेदार किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष किरण राणे, व सल्लागार अॅड्व्होकेट सलीम पटेल , कार्यकारी संचालक सिद्धी राणे, राकेश वाणी व सन्मवयक चिन्मय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी उपक्रम हाती घेण्यात आला. सदर उपक्रम राबविण्यासाठी संस्थेचे सदस्य व सल्लागार अॅड्वोकेट श्री सलिम पटेल, अध्यक्ष किरण राणे, विश्वस्त कृष्णा बोक्का, उपाध्यक्ष धर्मवीर सिंग अरोरा, नीरज करन, विजया शिंदे, प्रणय ढमाळ, योगेश खरात, अक्षय शिंदे, प्रमोद चांदपुरकर, आणि चिन्मय चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेवून सदर उपक्रमासाठी निधी संकलन केले. तसेच प्रगती फाउंडेशनच्या सर्व कर्मचारी वर्ग यांनीही आपल्या वेतनातून योगदान देत या सामाजिक उपक्रमास हातभार लावला.
याव्यतिरिक्त संस्थेकडून विविध भागात गरजूंना मोफत अन्न धान्य वितरण करण्यात येत आहे. संस्थेने सर्व देणगीदार व सहकारी वर्गाचे आभार मानले आहेत तसेच अजूनही ही कोरोना विरुद्दची लढाई संपली नसल्याने संस्थेच्या वतीने या सामाजिक उपक्रमासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
www.pragateefoundation.org











