महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई: अत्यंत प्रतिष्ठित समजलाजाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेसृष्टीत महानायक म्हणून ओळख असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केला आहे.

अमिताभ यांनी मोठ्या पडदा तर गाजवला आहे तसेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची भूरळ घातली आहे. रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीमधील त्यांचे सूत्रसंचालन खूप लोकप्रिय आहे.

अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर बिग बी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७६ व्या वर्षीही अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपट येत आहेत.

अमिताभ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण देश तसेच परदेशातील लोकांना आनंद झाला आहे. माझ्याकडून अमिताभ यांना मनपूर्वक शुभेच्छा, असे जावडेकर यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.