सरकारमध्ये काम करण्याची संधी, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम

मुंबई :मुख्यमंत्री फेलोशिप 2019ची घोषणा केली गेलीय. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यात माझ्याबरोबर सहभागी व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनीच केलंय. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं वय 21 ते 26 वर्षाच्या मधे हवं. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर यात प्रवेश घेऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2019 ही आहे.

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ११ महिन्यांच्या कालावधी आहे. उमेदवाराला दर महिन्याला 35 हजार रुपये फेलोशिप मिळेल. नामांकित संस्था, उद्योग वा सार्वजनिक उपक्रम संस्थेतील कमीत कमी १ वर्षाचा अनुभव असलेले तरुण या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतील. आयआयटी, आयआयएम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयं, एनआयटी, जेबीआयएमएस, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची अट शिथिल केली जाईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना कार्यक्रमानंतर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करता येईल किंवा उच्च शिक्षण घेता येईल.

सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात आपल्या आवडीचे करिअर निवडताना या कार्यक्रमातील सहभागाचा निश्चितच उपयोग होईल. शेवटी मिळणारं सर्टिफिकेट व्यावसायिक वाटचालीत महत्त्वाचं असेल.

स्वत:ची संस्था सुरू करताना या अनुभवाचा लाभ होईल.
धोरण आणि प्रशासन विषयाचं अभ्यासक्रमाचं पदव्युत्तर शिक्षण घेताना हा अनुभव उपयोगी पडेल.