
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेते. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडलीये. विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत . राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती मिळतेय. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे शपथ घेण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. अजित पवार यांनी दुपारी 2.30 वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.






