
मुंबई – महाराष्ट्र कोरोनाविरोधतली लढाई ही खंबीरपणे लढतो आहे.
महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या गाथा या कित्येक वर्षांच्या आहेत.
कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र कमी नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन, क्रांतिकारी विचार हे सगळं रुजवणारा आणि जपणारा हा महाराष्ट्र आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी कोरोनाविरोधातल्या लढाईत जिंकणार हे मला माहित आहे कारण माझ्या साथीला आपण आहात.
आपण कोरोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“लॉकडाउनपेक्षा मी थोडा वेगळा शब्द वापरेन जो सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही वापरला होता सर्किट ब्रेकर्स..अर्थात हे गतिरोधक आहेत.
व्हायरसची श्रृंखला तोडण्यासाठी हे गतिरोधक आवश्यक आहेत” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
३ मे नंतर आत्ता जी बंधनं आहेत त्यात आपण बरीच मोकळीक देणार आहोत. खासकरून ग्रीन झोन विभागात टपप्याटप्प्याने शिथिलता आणण्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले.
मात्र झुंबड उडाली, सावधगिरी बाळगली गेली नाही तर मात्र ही बंधनं पुन्हा घालावी लागतील.
कोरोनाविरोधातले हे युद्ध आपण जिंकणार आहोत, तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली ती अशीच असूद्या” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.






