जि प.शाळा विजयनगरचा निकाल एका क्लिकवर ऑनलाईन बोर्ड परीक्षा सारखा अभिनव प्रयोग

सातारा: सध्या करोनो मुळे सर्व क्षेत्र,व्यवसाय बंद आहेत त्याचप्रमाणे सर्व शाळाही बंद आहेत.दुस-या सत्राच्या परीक्षा सुद्धा रद्द कराव्या लागल्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांना यामुळे एकत्रित येणे शक्य नाही असा शासन आदेश आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सर्व शाळामधील विद्यार्थ्यांना आपला वार्षिक निकाल दिला जायचा मात्र यावर्षी हे शक्य होत नाही तर मग निकाल कसा द्यावा हा प्रश्न सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील जि प शाळा विजयानगरचे गुगल इनोव्हेटर शिक्षक बालाजी जाधव यांना हि पडला आणि या ग्रामीण भागातील शिक्षकांने एक अभिनव अशी युक्ती प्रत्यक्षात आणली.व आपल्या शाळेतील मुलांना एका क्लिकवर त्याचा निकाल घरी बसून ऑनलाईन पाहण्याची व डाऊनलोड करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

जि प शाळा विजयनगर ता. माण जि सातारा या शाळेतील उपक्रमशील शिक्षक बालाजी जाधव व मुख्याध्यापक भोजा काळेल या दोहोंनी आपल्या शाळेचा निकाल १० वी, १२ वी च्या निकालाप्रमाणे मुलांना एका क्लिकवर देण्याचा संकल्प केला व तो प्रत्यक्षात आणला सुद्धा.त्यांच्या शाळेची www.shikshanbhakti.in नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन नुसते विद्यार्थ्याचे नाव सर्च बॉक्स मध्ये टाईप केले की विद्यार्थ्याला त्याचे वार्षिक निकालपत्रक एका क्लिकवर त्याच्या समोर दिसणार आहे.उदा. Bhakti Jadhav असे नाव टाईप करायचे. अगदी सुंदर, रंगीबेरंगी असणारे हे वार्षिक निकालपत्रक विद्यार्थी तिथून डाऊनलोड पण करू शकतात अशी सुविधा देण्यात आली आहे.अशी किमया या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने केल्याने करोनाच्या प्रादुर्भावाने गर्दी न करता, शाळेत विद्यार्थी व शिक्षक न येता सुद्धा विद्यार्थी घरबसल्या आपला निकाल अगदी बोर्ड परीक्षे प्रमाणे पाहू शकणार आहेत.

बालाजी जाधव यांनी एका क्लिकवर केलेल्या निकालपत्रकात प्रथम सत्र व द्वितीय सत्र याचा श्रेणी नुसार निकाल दिसून येणार आहे. त्या निकालपत्रकात प्रत्येक विद्यार्याचा रंगीत फोटो सुद्धा असणार आहे.रंगीबेरंगी असे वार्षिक निकालपत्रक पाहून नक्कीच पालक व विद्यार्थी खुश होतील व सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन निकालाचा पर्याय बालाजी जाधव सारख्या शिक्षकांनी इतक्या ग्रामीण भागात एका जि प च्या शाळेसाठी राबवून राज्यातील प्रथमच जि प शाळेचा असा निकाल देण्याची एक उत्तम परंपरा सर्वांना घालून दिल्याने सर्व क्षेत्रातून बालाजी जाधव यांच्या या ऑनलाईन निकालचे कौतुक होत असून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारे निकाल देता येऊ शकतो याचा प्रत्यय दिला आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषेदेच्या शाळेत असे उपक्रम राबवणारे शिक्षक हे संपूर्ण राज्याला देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरत आहेत त्यांच्या या उपक्रमाला सर्व पालक, अधिकारी यांनी खूप कौतुक केले आहे.एका समान्य शिक्षकांने स्वताच्या प्रयत्नाने असा अभिनव उपक्रम राबवून सर्वांना जि प शाळेचे शिक्षक कायमच अभिनव उपक्रम करतात याचा प्रत्यय दिला आहे. व तो सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

crcmhaswadno3@gmail.com
बालाजी जाधव ,उपशिक्षक, जि.प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा

http://www.shikshanbhakti.in